तुम्ही पण मतदान करणार आहात मग आत्ताच जाणून घ्या कोणते पुरावे दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे.
महाराष्ट्राच्या माहिती व जनसंपर्क संचलनालयाने म्हटलं, "मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांची ओळख पटविण्यासाठी 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. या छायाचित्र ओळखपत्रांपैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे."
🛑 'हे' आहेत 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे:
1. आधार कार्ड.
2. मनरेगा रोजगार ओळखपत्र.
3. बँक किंवा टपालाचे फोटोसह पासबूक.
4. पारपत्र (पासपोर्ट).
5. वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स).
6. पॅनकार्ड.
7. भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी दिलेले स्मार्ट कार्ड.
8. कामगार मंत्रालयाचे आरोग्य विमा स्मार्ट कार्ड.
9. केंद्र किंवा राज्य शासनाचे निवृत्ती वेतनाचे दस्तावेज.
10. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र ओळखपत्र.
11. संसद सदस्य (खासदार), विधानसभा/विधानपरिषद सदस्य (आमदार) यांचे अधिकृत ओळखपत्र.
12. भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र.
(अनिवासी भारतीयांना त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक)
Comments
Post a Comment